भीमा-कोरेगाव प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

koregaon_bhima

टीम महाराष्ट्र देशा– भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या विरोधात पुणे सत्र न्यायालात दाखल केलेलं आरोपपत्र आपल्यासमोरही 8 तारखेपर्यंत सादर करावं असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले.

सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर काल या प्रकरणाची सुनावणी झाली. पुढील सुनावणी 11 डिसेंबरला होणार आहे. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, सुधीर ढवळे, महेश राउत, आणि रोना विल्सन यांना जून महिन्यात अटक केली आहे.