पाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश

ARUN GAWLI

नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पुढील 5 दिवसांमध्ये नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पत्नीच्या आजारपणाच्या कारणामुळे न्यायालयाने अरुण गवळीला पॅरोल मंजूर केला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सलग 2 वेळा त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच पुढील 5 दिवसांमध्ये नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात हजर राहण्याचे आदेश दिले.

विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने अरुण गवळीची यापुढे पॅरोलला मुदतवाढ देण्याबाबतची कोणतीही याचिका स्वीकारली जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानेच अरुण गवळीला 24 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अरुण गवळीची पत्नी गंभीर आजारी असल्याने न्यायालयाने सुरुवातीला अरुण गवळीला 45 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. यानुसार त्याला 27 एप्रिलपर्यंत आत्मसमर्पण करायचे होते. मात्र लॉकडाऊनमुळे नागपुरला परत येणे शक्य होत नसल्याचे कारण देत अरुण गवळी याने न्यायालयात पॅरोल वाढवण्यासाठी अर्ज दिला होता. यानंतर न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला होता. त्यामुळे अरुण गवळीला कारागृहात हजर होण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली होती.

तुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा

अखेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमधील शिथिलतेसोबतच न्यायालयाने तुरुंगातील आरोपी आणि गुन्हेगारांच्या पॅरोलबाबत कठोर भूमिका घेतल्याचं दिसत आहे. अरुण गवळीला 24 मे रोजी नागपुरच्या मध्यवर्ती कारागृहात हजर होणे अपेक्षित होते. मात्र लॉकडाऊनमुळे नागपुरला परत येणं शक्य नसल्याचं सांगत गवळीने न्यायालयात अर्ज सादर केला होता. मात्र यावेळी न्यायालयाने गवळीचा अर्ज फेटाळून लावत पुढील 5 दिवसांमध्ये नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात हजर होण्याचा आदेश दिले.

‘राज्यात मे महिन्यात आता पर्यंत ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप’