देवेगौडांना कोर्टाने ज्या प्रकरणात तब्बल २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला ते प्रकरण नेमके आहे तरी काय ? 

devegauda

बेंगळुरू : कर्नाटकच्या बेंगळुरू येथील कोर्टाने माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांना 10 वर्षांपूर्वी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत नंदी इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडोर एंटरप्रायजेस (एनआयसी) च्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कंपनीला दोन कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.

देव गौडा यांची मुलाखत 28 जून 2011 रोजी कन्नड वृत्तवाहिनीवर प्रसारित झाली होती. यावर देवेगौडा यांनी कंपनीविरूद्ध अवमानकारक गोष्टी बोलल्या होत्या. त्यानंतर कंपनीने देवेगौडा यांच्या या विधानाने कंपनीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे, असे सांगून मानहानीचा दावा दाखल केला. याच अपमानकारक टीकेसाठी कोर्टाने देवेगौडा यांना कंपनीला नुकसानभरपाई म्हणून 2 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत.

आठव्या पालिका दिवाणी व सत्र न्यायाधीश मल्लनागौडा यांनी एनआयएसने दाखल केलेल्या खटल्यावर हे निर्देश दिले. या कंपनीचे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक खेणी हे बिदर दक्षिणचे माजी आमदार आहेत.जनता दल (सेक्युलर) च्या प्रमुखांनी एनआयएस प्रकल्पांना लक्ष्य केले होते आणि त्यास लूट म्हणून संबोधले होते.

कोर्टाने 17 जूनच्या निर्णयामध्ये कंपनीचा प्रकल्प मोठा आणि कर्नाटकच्या हिताचा असल्याचे म्हटले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या अपमानास्पद विधाने करण्यास परवानगी दिली गेली तर राज्यात मोठ्या जनहिताचा असा मेगा प्रकल्प राबविण्यात अडचणी येतील असे कोर्टाने सांगितले. अशा प्रकारच्या वक्तव्यांवर अंकुश लावला पाहिजे असे देखील कोर्टाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP