fbpx

जायकवाडी धरणाला धोका ; सुरक्षेत केली वाढ

औरंगाबाद : आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण असलेल्या जायकवाडी धरणाच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे. तर गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच धरणावरील पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला असून, या सर्व घडामोडीमुळे खळबळ उडाली आहे.

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण नुकतेच टक्के भरले आहे. त्यानंतर जायकवाडी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. मात्र आता पर्यटकांना धरणाच्या भिंतींवर जाण्यापासून रोखण्यात आले आहे. तर परिसरात खासगी गार्ड आणि पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.