दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; नेपाळ सीमेवर अतिदक्षतेचा इशारा

terrorism1

गोरखपुर : जैश-ए-मोहम्मदचे ६ दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे नेपाळ सीमेवर सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. या परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली असून सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी नेपाळमार्गे भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत.

त्यामुळे नेपाळ सीमेवरील जवानांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. तसेच जागोजागी नाकाबंदी करुन शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे, असे अधिका-यांकडून सांगण्यात आले.