fbpx

रायगडावरील सेलिब्रेटींचं फोटोसेशन निंदनीय – संभाजीराजे

chtrapati sambhaji

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासह विश्वास पाटील यांनी थेट रायगडावरील मेघडंबरीत फोटो सेशन केल्यानं त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येतीये. याप्रकरणी त्यांनी माफी देखील मागितली आहे.

दरम्यान आता खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी याबद्दल ट्विट करुन या फोटो सेशनबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.’रायगडावरील सिंहासनाच्या चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मुर्तीकडे पाठ करुन काढलेले काही सेलिब्रेटींचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हे खरोखरच निंदनीय आहे,’ असं संभाजीराजेंनी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. ‘आज होणाऱ्या रायगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून त्यातील नियम सर्वांना बंधनकारक असतील,’ असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सरकारकडून शेतकऱ्यांची पुन्हा थट्टा ; गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे केले सुलतानी पंचनामे

2 Comments

Click here to post a comment