अखेर छगन भुजबळांना केईएम हॉस्पिटलमध्ये हलवणार…

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अखेर जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असून त्यांना पुढील उपचारांसाठी केईएम हॉस्पिटलमध्ये हलवणार आहे.

जेजे रुग्णालयात हिपॅटोपॅनक्रिअॅटोबिलिअरी (एसपीबी) आणि गॅस्ट्रोएन्टरोलॉजी (जीआय) सुपर स्पेशालिटी विभाग उपलब्ध नाहीत. त्यामुळे पोटाच्या आजारावर उपचार मिळण्यासाठी केईएम रुग्णालयाच्या हिपॅटोपॅनक्रिअॅटोबिलिअरी विभागात छगन भुजबळ यांना दाखल केलं जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली होती. भुजबळांना योग्य उपचार मिळण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं होतं. इतकंच नाही, भुजबळांना काही झालं तर त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल, असंही म्हटलं होतं.

भुजबळांचे काही बरवाईट झाल्यास मुख्यमंत्री तुम्हीच जबाबदार- शरद पवार

छगन भुजबळ यांना योग्य उपचार मिळत नाहीत – धनंजय मुंडे

You might also like
Comments
Loading...