राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलीही मरगळ नाही : छगन भुजबळ

Chhagan-Bhujbal

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. काही दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला मात्र अधिक जोर धरला आहे. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी मध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सूचक विधान केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलीही मरगळ नसल्याचे भुजबळ यांनी म्हणले आहे.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये कोणतेही नवल नाही. त्यांच्या सभांसाठी सगळीकडेच जोरात तयारी सुरू असते, असे म्हणत भुजबळ यांनी मोदींवर टोला लगावला.

दरम्यान, कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने बुधवारी प्रचारात आघाडी घेत आपली पाहिली उमेदवारांची यादी घोषित केली आहे.