जामिनासाठी छगन भुजबळ पुन्हा हायकोर्टात

टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरींग कायद्याखाली अटक असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्याचा फायदा घेत आपली जामिनावर मुक्तता करावी, अशी भुजबळ यांची मागणी आहे.

बुधवारी न्यायमूर्ती पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा दोन वर्षांहून अधिक काळापासून आपण तुरुंगात आहोत, आपले वय आता 71 वर्षे झाले आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपली जामिनावर सुटका करावी, अशी विनंती त्यांनी हायकोर्टात केली. याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.