‘हे’ दोन आयएएस अधिकारी घेणार घटस्फोट

ias

जयपूर : आयएएस अधिकारी टीना डाबी आणि तिचा आयएएस पती अथर आमिर यांनी 2015 मध्ये यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. वृत्तानुसार, दोघांनी 17 नोव्हेंबर रोजी जयपूर येथील कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

सिव्हिल परीक्षेत अव्वल स्थान मिळवणारी टीना आणि द्वितीय क्रमांकावर राहिलेल्या अथर या दोघांच्या प्रेमाची बरीच चर्चा व्हायची. असे म्हणतात की प्रशिक्षणादरम्यान टीना आणि अथर एकमेकांच्या जवळ आले. 2018 मध्ये जम्मू-काश्मीरमधील टीना दाबी आणि अथर आमिर उल शफी खान यांचे लग्न झाले होते.

रिपोर्ट्सनुसार कोर्टाला देण्यात आलेल्या घटस्फोटाच्या याचिकेत या दोघांकडून असे सांगण्यात आले आहे की आता आपण एकत्र राहू शकत नाही. सध्या दोन्ही अधिकारी जयपूरमध्ये तैनात आहेत. टीना वित्त विभागामध्ये सहसचिव आहेत तर अथहर मुख्य कार्यकारी अधिकारी ईजीएस म्हणून काम पाहतात.

दरम्यान, टीनाने काही काळापूर्वी सोशल मीडिया अकाउंट्समध्ये तिच्या नावावरून खानचे आडनाव काढून टाकले होते. यानंतर अथरनेही टीनाला इन्स्टाग्रामवर फॉलो केले नाही. यानंतर दोघांमध्ये काही तरी भिनसल्याची बातमी सर्वत्र पसरली होती.

महत्वाच्या बातम्या