Kirit Somaiya मुंबई : मुंबईतील मेट्रोच्या कारशेडचा वाद थांबायचे नाव घेत नाहीये. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबईचे फुफुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरे परिसरात मेट्रो कारशेडचे कामसुरू करण्यात आले होते. मात्र आरे परिसरातील झाडे तोडल्यास पर्वावरणाच्या समस्या निर्माण होतील म्हणून अनेक पर्यावरणवादी संघटनांनी आणि शिवसेनेने सुद्धा त्याला विरोध केला होता.
त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने आरे कारशेडला स्थागिती देत हा प्रकल्प कांजूर मार्ग येते हलवला. मात्र नुकत्याच स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मेट्रो कारशेड आरे परिसरातच होणार असे स्पष्ट केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत आरे कारशेडचं काम लवकरात लवकर सुरु करावं अशी मागणी सरकारकडे केली आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी माझ्यावरचा राग हा मुंबईच्या जनतेवर काढू नका असे म्हणत, मेट्रो कारशेड आरे परिसरात न करण्याची विनंती सरकारकडे केली होती. मात्र तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेड हे आरे परिसरात होणार असून कारशेडचं २५ टक्के काम पूर्ण झालं असल्याचं स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<