‘हे मोदी सरकार की लाला सावकार’, महागाईवरून राहुल गांधींचा खोचक टोला

rahul vs modi

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारवर महागाईच्या मुद्द्यावरून सातत्याने विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. देशाच्या आर्थिक स्थिती, इंधन दरवाढ तसेच कोरोनाची परिस्थिती याला जबाबदार केंद्र सरकार आहे.असे विरोधक आरोप करतात. तसेच मोर्चे, आंदोलन देखील देश भारात होतात. कधी बैलगाडी आंदोलन व कधी क्रिकेट पटूच्या शैलीत १०० रुपये पेट्रोल झाल्यावर केलेले आंदोलन आपण पाहतो. विरोधी पक्षाचे अनेक नेते यावर सोशल मीडियाद्वारे भाष्य करत असतात.

दरम्यान, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील इंधन दरवाढीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. ते एका वृत्तवाहिनीच्या बातमीला अनुसरून ते म्हणाले की, ‘एकीकडे ते कर्ज घेण्यास जनतेला प्रत्साहित करत असतात आणि दुसरीकडे ते कर वसुलीद्वारे अंधाधुंध कमावत आहेत. हे सरकार आहे की जुन्या हिंदी चित्रपटातील लोभी सावकार?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

तर दुसरीकडे पिगाससद्वारे हेरगिरी किंवा फोन टॅपिंग प्रकरणी काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर केंद्र सरकारनेही या आरोपांवर संसदेत स्पष्टीकरण दिलं आहे. मोदी सरकार राज्यघटना आणि कायद्याची हत्या करत आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे. देशाच्या सुरक्षेशी खेळ केला आहे. मोदी सरकार बेडरूममधल्या गुजगोष्टीही ऐकत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP