‘अहो तुमच्याकडे पाणी येतय का?’, सूर्या आणि बुमराहचा मजेशीर फोटो व्हायरल

surya

नवी दिल्ली : आयपीएलच्या दुसऱ्या हंगामासाठी संघ दुबई येथे पोहचले आहेत. दुसऱ्या टप्प्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ देखील सज्ज झाला आहे. इंग्लंड मधून परतल्यावर कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह कोरोनाचे नियमन पाळत ६ दिवस क्वारंटाईनमध्ये आहेत. नुकताच मुंबई इंडियन्सने सूर्य आणि बुमराहचा एक मजेशीर फोटो पोस्ट केला आहे. ज्याला चाहत्यांकडून पसंत केले जात आहे.

मुंबई इंडियन्स नेहमी आपल्या खेळाडूंचे मजेशीर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोत सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा वरच्या मजल्यावर बाल्कनीमध्ये उभे दिसत आहेत. तर खालच्या मजल्यावर बुमराह आणि त्याची पत्नी संजना उभे आहेत. ते चोघेही एकमेकांकडे बघत गप्पा मारत आहे. यादव फॅमिली जणू बुमराहांना “अहो तुमच्याकडे पाणी येतेय का?” असे विचारात असावे. असा फोटोला साजेसा मजेदार कॅप्शनही लिहला आहे. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुंबईचा पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे. १९ सप्टेंबर रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. मुंबईचा संघ पहिल्या टप्प्यात ७ पैकी ४ सामने जिंकून गुण तालिकेत चौथ्या स्थानी आहे.

महत्त्वाच्या बातम्या