मुंबई : राज्यात येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यकर्त्यांच्या टीका टिप्पणीला उधाण आल आहे. अशातच आता मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विटर वर व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
बंडखोर आमदारांच म्हणणं आहे कि, शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजप सोबत जावं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत बोलताना प्रतिक्रिया देत “ज्यांना गद्दारी करायची त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी असं म्हटलं होते. “लढाई निर्णयाक निष्ठेने असते. त्यामुळे ज्यांना जायचयं त्यांनी खुशाल जा. सहकारात आपण काय करतो आहे? गावात संस्था निर्माण कराव्यात नियमबाह्य नाही. सत्तेचा दूरगामी उपयोग व्हावा. संधीचे सोने करा.” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले होते.
मात्र आता मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विटरवर एका व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. “अहो पण आता राहीलयं कोण?” असा खोचक सवाल त्यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
अहो पण आता राहीलय कोण ? 😅 pic.twitter.com/6BJvgcKJMd
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 28, 2022
दरम्यान, शिवसेना पक्ष राष्ट्रवादीकडे घाण असल्याची टीका देखील गजानन काळे यांनी केली होती. “गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीकडे शिवसेना पक्ष घाण ठेवल्यासारखा वाटत होता. अबू आझमी यांच्या दोन आमदारांबरोबर मिठया कोणी मारल्या हे सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे” असं देखील मनसेचे नेते गजानन काळे यांनी म्हटलं होतं. मनसे नेते गजाजन काळे यांच्या या ट्विटची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<