fbpx

अहो अजितदादा एवढे मनाला लावून घेऊ नका : राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : रविवारी पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात राज ठाकरे, अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जलसंधारणाच्या मुद्द्यावरून चांगलेच चिमटे एकमेकांना काढले होते. राज ठाकरेंनी केलेली टीका अजित पवार यांना चांगलीच झोंबली होती. आता यावरच बोलताना राज ठाकरे म्हटले की अहो अजितदादा एवढे मनाला लावून घेऊ नका. मी अजित दादांना उद्देशून बोललो नव्हतो., १९६० पासून जे घडते आहे त्याबद्दल बोललो होतो असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे ?

मी जे बोललो ते १९६० पासून सुरू आहे. अजित पवारांनी ते मनाला लावून का घेतलं? माहित नाही मात्र अजित पवारांनी ती गोष्ट मनाला लावून घेऊ नये असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. राज्यात १ लाख २० हजार विहिरी लोक सहभागातून बांधण्यात आल्याची माहिती समोर आली, असे असेल तर सरकारी अधिकारी काय करत आहेत? ते आमिर खानसाठी काम करत आहेत का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. 

पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप विजेत्या गावांचा नुकताच पुण्यात गौरव करण्यात आला. दरम्यान, यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, महाराष्ट्राला स्वतंत्र होवून ६० वर्ष झाली. मात्र, आजवर सिंचनावर खर्च केलेला पैसा कुठे गेला असा सवाल केला. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.

काही लोक फक्त बोलघेवड्या सारख बोलतात, अजित पवार

काही लोकांना काही करायचं नसत किंवा दाखवायचं नसत त्यामुळे ते बोलघेवड्या सारखे बोलतात, लोकांची सभा जिंकायची असते आणि निघून जायचं असं चालत नाही, म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

भाजपमुळेचं बंद पडले उद्योग धंदे-अजित पवार