डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी भाग्यश्रीने दिल्या काही टिप्स

भाग्यश्री

मुंबई : देशात कोरोनाची स्थिती असल्याने काही कामे अनेक लोक ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने करतं आहेत. घरून काम करत असल्याने अनेकांना कॉम्पयुटर अधिक वेळ काम करावे लागते यामुळे डोळ्यांना त्रास होण्याची अधिक शक्यता असते. यासाठी आता ‘मैंने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्रीने डोळ्यांचे काही व्यायाम सांगितले आहेत.

भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती म्हणते की, हाताची दोन बोटं घ्या आणि डोळ्यांवर ठेवून एकदा बाहेरच्या बाजूला आणि एकदा आतल्या बाजूला फिरवा. “वर्क फ्रॉम होम! हा डिजिटल जगाचा आशीर्वाद आह की उपहास आहे? बरं. आपल्या डोळ्यांवर तरी कमीतकमी याचा तणाव होतो, आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्हिटॅमिन A ची गरज असते,’ असे आरोग्याच्य दृष्टीने महत्त्वाचा व्यायाम ती सोशल मिडिया द्वारे सांगत आहे.

पुढे भाग्यश्री म्हणाली, ‘गाजर, हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन A जास्त आहे. परंतु आपल्या वाढणाऱ्या वयामुळे आणि डिजिटल गोष्टींचा अतिरिक्त वापर केल्यामुळे आपल्या डोळ्यांची क्षमता कमी होते. आपले डोळे मजबूत, तेजस्वी राहण्यासाठी हा व्यायाम नक्कीच करा.’ असेही ती आवर्जून लोकांना सांगत आहे.

‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातील भूमिकेमुळे तिला पचंड लोकप्रियता मिळाली. अनेकांनी तिच्या अभिनयाचे कौतुक देखील केले होते. सध्या ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना अनेक टिप्स देत असल्याचे ही पाहायला मिळते.

महत्वाच्या बातम्या

IMP