शेकडो आमदारांचा एकच प्रश्न ‘शेतकरी कर्जमाफीचे’ काय झाले ?

टीम महाराष्ट्र देशा: नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु होवून तीन दिवस झाले तरी विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज सुरळीत होताना दिसत नाही. शेतकरी कर्जमाफी, विदर्भातील कपासीच्या पिकावरील रोगांचा प्रादुर्भाव, फवारणी दरम्यान दगावलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न, अशा अनेक मुद्यांवर विरोधक सरकारची कोंडी करताना दिसत आहेत. मात्र यातील सर्वात विशेष म्हणजे तब्बल १०० च्या वर आमदारांनी विचारलेला शेतकरी कर्जमाफीचा विषय

राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना नावने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणीची कुठपर्यत आली हे कळत नाही. याच योजनेबाबत विधानसभेत तब्बल १०० हून अधिक आमदारांनी लेखी प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना ५ डिसेंबपर्यंत १३.४९ लाख शेतकऱ्यांना ८६१०.६३ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यासाठी संबंधित बँकांमध्ये पैसे जमा करण्यात आल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

विशेष म्हणजे सध्या कारागृहात असलेले छगन भुजबळ यांनीही हाच प्रश्न विचारला होता.

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...