शिवसेनेकडून राजकीय सोयीसाठी आरोग्य खात्याचा वापर : हेमंत टकले

टीम महाराष्ट्र देशा- विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत संपून सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानं राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेनेने आरोग्य खात्याचा अतिरिक्त भार एकनाथ शिंदेंकडे दिला आहे. शिवसेना जरी जाहीररित्या भाजपावर टीका करत असली तरी खातेवाटपामध्ये जे मिळालं त्यातच सुखी असल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या याच पवित्र्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले यांनी टीका केली आहे.

दीपक सावंत यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेने नवीन व्यक्तीला ह्या खात्याचा पदभार न देता ज्यांच्याकडे आधीच सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्या एकनाथ शिंदे यांना हे खाते सोपवलेय. कोणा इतर नेत्यास अधिभार दिला असता तर शिवसेनेला सत्तेची लालसा आहे अशी टीका झाली असती म्हणून आपल्या राजकीय सोयीसाठी शिवसेनेने हे पाऊल उचलले असल्याची टीका टकले यांनी  केली आहे. या सगळ्या खेळखंडोब्यात सामान्य जनतेच्या आरोग्याकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे टकले म्हणाले. महाराष्ट्रामध्ये आरोग्य खात्याचे अनेक गंभीर प्रश्न आहेत. खात्याला पूर्णवेळ देणाऱ्या मंत्र्याची गरज आहे, असे मतही हेमंत टकले यांनी व्यक्त केले आहे.

दुष्काळ गंभीर , शिवसेना खंबीर… बीड येथील उद्धव ठाकरेंच आक्रमक भाषण