संघर्षनायक रामदास आठवले यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदी निवड व्हावी ही आंबेडकरी जनतेची इच्छा

हेमंत रणपिसे : उद्या दि. 30 मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नवीन केंद्रीय मंत्रीमंडळाचा शपथविधी राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींची लाट आली होती यंदा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींची लाट नव्हे तर वादळ आले होते. मोठ्या प्रमाणात अभूतपूर्व यश नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएला मिळाली या विजयाचा उत्सव भाजपसह एनडीएतील मित्र पक्षांनी साजरा केला. या विजय उत्सवात रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनताही सहभागी झाली होती.

भाजप आणि एनडीएच्या विजयात देशभरातील दलित बहुजनांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागांवर महायुतीला विजय मिळाला या विजयात आंबेडकरी जनतेचा सिंहाचा वाटा आहे. आंबेडकरी जनतेला महायुतीकडे आणि देशभरातील दलित बहुजनांचे मतदान भाजपकडे वळविण्यात लोकनेते रामदास आठवले यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. निवडणुकीच्या रणांगणात नरेंद्र मोदींच्या बाजूने शूरविर योध्द्यासारखे रामदास आठवले काँग्रेससह सर्व विरोधकांवर तुटून पडले होते. निवडणुकीच्या रणांगणात एनडीएची बाजू मजबूत करण्यासाठी अतुलनिय शौर्य गाजविलेला एकमेव आंबेडकरी योद्धा रामदास आठवले ठरले आहेत. भारतीय बौद्धांचे, आंबेडकरी जनतेचे, देशभरातील दलित बहुजनांचे प्रतिनिधी म्हणून रामदास आठवले यांची केंद्रीय मंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली पाहिजे ही समस्त जनतेची इच्छा आहे. या इच्छेमुळे आंबेडकरी जनतेचा कौल भाजप महायुतीला मिळाला भाजप महायुती आणि एनडीएच्या पदरात आंबेडकरी जनतेने भरभरुन मतदान दिले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भारत सरकार चालविण्याची दुसऱ्यांंदा संधी बहुमताने मिळवून देण्यात आंबेडकरी जनतेचा मोठा वाटा आहे.

उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात रामदास आठवलेंना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यास आंबेडकरी जनता देशभर हर्षउल्हास विजयोत्सव साजरा करेल. आपल्या लाडक्या नेत्याला केंद्रीय कॅबिनेट पदाची शपथ घेताना देशभरातील कोट्यावधी जनतेला पाहायचे आहे. या शपथविधी सोहळ्याकडे आंबेडकरी जनतेचेे डोळे लागले आहेत. उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात रामदास आठवलेंना कोणते मंत्रीपद मिळते याची देशभरातील दलित बहुजनांना उत्कंठा लागली आहे. रामदास आठवलेंना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झालेले देशभरातील दलितांना पाहायचे आहे. रामदास आठवले कॅबिनेट मंत्री झाले म्हणजे देशभरातील प्रत्येक दलिताला आपल्या कुटूंबातील कर्ता माणूस मंत्री झाल्याचा मनस्वी आनंद होईल. हा आनंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिकन जनतेच्या पदरात टाकला पाहिजे.

रामदास आठवले मंत्री झाले की, आंबेडकरी चळवळीतील सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा आपण स्वत: मंत्री झालो आहोत असा आनंद होतो. हे यश रामदास आठवले यांच्या कर्तृत्वाचे, नेतृत्वाचे व वक्तृत्वाचे आणि सुस्वभावाचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दुसऱ्यांंदा प्रधानमंत्री होत आहेत. त्यांना जे यश मिळाले आहे. त्यात एनडीएच्या घटकपक्ष म्हणून रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाचे योगदान आहे. 2014 पेक्षा 2019 लोकसभा निवडणुक नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी कठीण होती. या काळात मोदींनी घेतलेले नोटबंदी आणि जीएसटीचे अप्रिय निर्णय अडचणीचे ठरले होते. तसेच विरोधकांनी मोदी हे संविधान बदलणार असा अपप्रचार मोठ्या प्रमाणामध्ये चालविला होता. या प्रचाराचा मुकाबला करताना भाजपचे नेते कमी पडत होते. शत्रुध्न सिंन्हा यांनी भाजपची साथ सोडली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ममता बॅनर्जीची तृणमुल काँग्रेस, बसपा अशा अनेक पक्षानी मोदींना टार्गेट करीत टीका आणि अपप्रचार चालविला होता. अशा काळात रामदास आठवले यांनी नरेंद्र मोदींची बाजू मजबूतपणे मांडणे चालू ठेवले.

नरेंद्र मोदी आणि भाजप हे दलित विरोधी नाहीत तसेच संविधान बदलणार नाहीत. आरक्षणाला धक्का देणार नाहीत. मोदी हे संविधानाचे विरोधक नसून संविधानाचे संरक्षक आहेत. हे आंबेडकरी जनतेला पटविण्यात रामदास आठवले यशस्वी झाले. नरेंद्र मोदींच्या काळात मुंबईत महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकांसाठी हिंदु मिलची जमीन हस्तांतरीत करण्यात आली. लंडनमधील हेनरी रोडवरील निवासस्थानी डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात आले. दिल्लीत सव्वीस अलीपूर रोड या निर्वाणभूमीवर भीमस्मारक उभारण्यात आले. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून देशभर साजरा करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त संविधानाच्या गौरवासाठी संसदेचे दोन दिवसीय स्वतंत्र अधिवेशन घेण्यात आले.

ऍट्रोसिटी अॅक्ट विरोधी निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ऍट्रोसिटी अक्टसाठी वटहुकूम काढून हा कायदा मजबूत केला. ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देण्यात आला. अशी अनेक कामे मोदी सरकारच्या काळात करण्यात आली त्यामुळे नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन रामदास आठवले देशभर करीत होते. लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर संसदेच्या सेंटर हॉलमध्ये एनडीएच्या झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रथम भारतीय संविधानाला अभिवादन केले. संविधान आणि संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन मोदींनी विरोधकांना चोख उत्तर दिले आहे. मोदी संविधान बदलणार या विरोधकांच्या आरोपातील हवा काढून टाकण्यात मोदींना यश आले आहे. एनडीएच्या बैठकीत संविधानाला अभिवादन करुन मोदींनी त्यांच्या दृष्टीने संविधान किती महत्त्वाचे आहे हे सिद्ध केले आहे. या त्यांच्या कृतीतून विरोधकांनी मोदींवर संविधान बदलणार असा केलेला आरोप त्यांच्या मनात घर करुन होता. हे स्पष्ट झाले आहे. मोदींवर विरोधकांनी संविधानाबाबत केलेले आरोप हे या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा ठरले होते. मात्र या आरोपांचे वार परतवून लावण्यात रामदास आठवले यांनी मोदींची ढाल म्हणून मोठी कामगिरी पार पाडली आहे. या कामगिरीचे बक्षिस म्हणून रामदास आठवले यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदी बढती दिली पाहिजे. ही समस्त आंबेडकरी जनतेची इच्छा आहे.

शासनकर्ती जमात व्हा असा संदेश महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी दिला आहे. त्यानुसार रामदास आठवले गेली तीन दशके सत्तेचे राजकारण करीत आहेत. सत्तेपुढे शहाणपन चालत नाही असा एक वाक्यप्रचार आहे. याचा अर्थ समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता हाती असली पाहिजे. रिपब्लिकन गटांचे बेकीचे राजकारण पाहता रामदास आठवले एकमेव असे रिपब्लिकन नेते आहेत. त्यांनी बेकीचे नव्हे तर एकीचे राजकारण केले आहे. समाज जोडण्याचे बेरजेचे राजकारण केले आहे. इतर कुणावरही टीका न करता जोडण्याचे काम केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात पोचविला आहे. अगदी नागालँड , मिझोराम, त्रिपूरा, आसाम, ओडिसा, हिमाचल, अरुणाचल, या प्रदेशासोबत पाँडिचेरी, तामिळनाडू, कन्याकुमारी ते जम्मूकाश्मिरपर्यंत रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा गावागावात पोहोचविण्याचे काम रामदास आठवलेंनी केले आहे.

देशभरातील रिपब्लिकन पक्षाची प्रचंड मोठी ताकद एनडीएसोबत उभी केली. संपूर्ण देशात विरोधक नरेंद्र मोदींवर टिका करताना एकमेव रामदास आठवले नरेंद्र मोदींचे जोरदार समर्थन करीत होते. विरोधकांनी कितीही आरोप केले तरीही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारचा विजय होणार असे सांगत होते. निवडणुकीत कोण विजयी होणार हे कोणालाच ठामपणे ओळखता येत नाही. मात्र रामदास आठवले अशा दूरदृष्टीचे नेते आहेत की त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा विजय होणार हे ओळखले होते. त्यामुळे भाजपला देशभर पाठिंबा देताना महाराष्ट्रात एकही जागा लढविली नाही. भाजप शिवसेना यांनी आपसात जागा वाटप करुन महायुती जाहीर केली होती. त्यामुळे महायुतीच्या विजयासाठी एकही जागा न लढून मनाचा मोठेपणा रामदास आठवलेंनी दाखविला. मोठी झेप घेण्यासाठी कधीकधी माणसाला दोन पावले मागे यावे लागते त्याप्रमाणे एकही जागा न लढून दोन पावले मागे येण्याची भूमिका आठवलेंनी स्विकारली आता कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची वर्णी लागल्यास त्यांनी मोठी झेप घेतली. हे सिद्ध होईल. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात पहिले केंद्रीय कायदा मंत्री होते. त्यानंतरच्या सहा दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचा एकही प्रतिनिधी केंद्रीय मंत्रीमंडळात पोहोचू शकला नाही.

रामदास आठवले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले असे अनुयायी ठरले आहेत की ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर 67 वर्षांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळवू शकले. आणि आता रामदास आठवले हेच एकमेव नेते ठरतील की जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे पहिले केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा बहुमान मिळवू शकतील. संघर्षनायक रामदास आठवले हे केंद्रीय कॅबिनेट मंत्री व्हावे ही आंबेडकरी जनतेची ईच्छा आहे.