लोकसभेसाठी भाजपकडून हेमंत पटलेंना उमेदवारी

मुंबई: नाना पटोले यांनी भाजप सरकारवर टीका करत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. तेव्हा त्यांनी नरेंद्र मोदींवर देखील टीकास्त्र सोडले होते. पाटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत असून भाजपाने माजी आमदार हेमंत पटले यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपसाठी हि निवडणूक खुप महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कार्यकर्ता मेळावे, प्रशिक्षण घेतले जात आहेत. गेल्या दोन दिवसांत भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद क्षेत्रांमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे पार पडले.

२८ मे रोजी या जागेसाठी मतदान होणार असून ३१ मे रोजी मतमोजणी होईल. राष्ट्रवादीकडून खा.प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षाताई पटेल यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असून माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, माजी आमदार मधुकर कुकडे, विजय शिवणकर हेसुद्धा उमेदवार असू शकतात.