मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आहे. मंगळवारी सकाळी अशी माहिती मिळाली की, उद्धव ठाकरे सरकारच्या १३ बंडखोर आमदारांनी गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकला असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील आहेत. याची माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. आता या पार्शवभूमीवर अभिनेत्री हेमांगी कवी हिने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ती पोस्ट खूप चर्चेत आहे.
हेमांगी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तिने तिचे मत व्यक्त केले आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत ती म्हणाली, ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?
तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय बनली आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. “माणसाला जनावर म्हणलं तर राग येतो आणि वाघ म्हणलं की भारी वाटतं.पण त्यांना कोण सांगणार वाघ सुद्धा जनावरच आहे”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :