हेमा मालिनींनी ‘अनोख्या’ प्रकारे केली दुर्गामातेला प्रार्थना

hemamalini

मुंबई : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. आदिशक्तींची पूजा देशभरात या काळात केली जाते. महाराष्ट्रात तुळजापूर, कोल्हापूर, वणी आणि माहूर या साडेतीनशक्तिपीठांमध्ये पारंपरिक पद्धतीने हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर राज्यातील लाखो भाविक देवीचे मनोभावे दर्शन घेत असतात.

मात्र या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे मंदिरे उघडलेली नाहीत. या उत्सव काळात देवींचे सर्व धार्मिक विधी पार पडणार असल्याचेदेवस्थान समितींमार्फत असून भाविकांना देवींचे दरवर्षीप्रमाणे दर्शन घेता येणार नाही. मंदिर व्यवस्थापनांनी भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय करून दिली आहे.

दरम्यान, या  उत्सवातसाठी ‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी यांनी दुर्गापूजेसाठी नुकतीच दोन गाणी रेकॉर्ड केली आहेत. हेमा मालिनी यांना हि गाणी रेकॉर्ड करून फार आनंद झाला आहे त्या म्हणाल्या कि, “मी आधी देखील गाणी गायले आहे. मी पूर्वी भक्ती क्रमांक देखील केले आहेत. पण यावेळी, मी माझ्या समाधानासाठी गायले आहे.

या गाण्यांना अंजली दयाल यांनी संगीत दिले, व आवाज हेमामालिनी यांनी दिला आहे. हि, गाणी गायल्यानंतर हेमा मालिनी म्हणाल्या कि, जेव्हा लता मंगेशकर जी त्यांचे म्हणणे ऐकतील व त्यांना मान्यता देतील तेव्हाच मला समाधान वाटेल.”

महत्वाच्या बातम्या-