बर्थ डे स्पेशल- हेमा ‘बियॉण्ड द ड्रीम गर्ल’

hema malini b day speical

हेमा या इंडस्ट्रीत ड्रीमगर्ल आणि बसंती या नावांनी प्रसिद्ध आहेत. तीन दशकांहून अधिकच्या यशस्वी करिअरमध्ये हेमा यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. प्रोफेशन असो, वा पर्सनल लाइफ हेमा नेहमी चर्चेत राहिल्या.आज वाढदिवसाच्या मुहूर्तावर हेमा मालिनी यांचे ‘बियॉण्ड द ड्रीम गर्ल’ या त्यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन होत आहे. राम कमल मुखर्जी लिखित या जीवनचरित्रात हेमा मालिनी यांच्या आयुष्यातील अनेक किस्से आपल्याला वाचायला मिळणार आहेत.

hema malini b day speical
file photo

बॉलिवूडमध्ये हेमा मालिनी यांनी पाच दशकांच्या कारकिर्दीत आपल्या अदांनी आणि अभिनयाने सर्वांना वेड लावले. उत्तम नृत्यांगणा, अभिनेत्री, निर्माती आणि आता राजकारणातील सक्रिय नेत्या असलेल्या हेमा यांनी वयाच्या १५व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी यश चोप्रा, रमेश सिप्पी, रामानंद सागर यांसारख्या अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले असून, आजही त्या ‘ड्रीम गर्ल’ म्हणूनच ओळखल्या जातात.

hema malini b day speical
file photo

.
सपनो का सौदागर’ या १९६८ साली आलेल्या चित्रपटाने हेमा यांनी राज कपूर यांच्यासह बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. आजही त्यांच्या भूमिका सिनेप्रेमींच्या लक्षात आहेत.’जॉनी मेरा नाम’ (१९७०), ‘अंदाज’ (१९७१), ‘सीता और गीता’ (१९७२), ‘शोले’ (१९७५), ‘ड्रीम गर्ल’ (१९७७), ‘त्रिशूल’ (१९७८) या चित्रपटांतील दमदार भूमिकांनी हेमा यांनी त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवल.८० च्या दशकात हेमा यांनी ‘क्रांती’, ‘कुदरत’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘अंधा कानून’ या चित्रपटांमध्ये काम केले.शाहरुख खान आणि दिव्या भारती यांच्या १९९० साली आलेल्या ‘दिल आशना है’ चित्रपटाने त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले.

hema malini b day speical
file photo

२००३ साली ‘बागबान’मधून त्यांनी पुनर्पदार्पण करत आपल्या अभिनयाची जादू कायम असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर त्या ‘वीर झारा’, ‘लागा चुनरी में दाग’, ‘आरक्षण’ आणि ‘एक थी राणी ऐसी भी’ चित्रपटांमध्ये काम केले.हेमा यांनी २००४ साली भारतीय जनता पार्टीमध्ये पाऊल टाकले. तेव्हापासून त्या आजपर्यंत राजकारणात सक्रिय नेत्या म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या मथुरातील लोकसभेच्या सदस्य आहेत.
हेमा यांना २००० साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.