माणुसकी सोडू नका मुंबई-पुणेकरांना गावी येउद्या, राजेश टोपेंचे भावनिक आवाहन

मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यासही मज्जाव आहे. मात्र तरीही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, सोलापूरसह अनेक ठिकाणी अनेक नागरिक सकाळपासूनच भाजी खरेदी करण्यासाठी तसेच इतर विविध कामांसाठी रस्त्यावर उतरले. त्यामुळे एकीकडे शासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी उपाय केले जात असताना दुसरीकडे मात्र असंख्य नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

देशामध्ये कोरोनाव्हायरसचं संकट फैलावलं असल्यामुळे अनेक राज्यामध्ये संचारबंदीसारखे कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण देशामध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमिवर सगळ्या जिल्ह्यांच्या सीमादेखील सील करण्यात आल्या आहे. कोल्हापूरमध्ये तर नागरिकांनी रस्त्यावर मोठे दगड टाकून रस्ता बंद केला आहे.

Loading...

मुंबईकर आणि पुणेकरांसाठी अनेक जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सगळे लोक सुट्ट्या लागल्या म्हणून गावी जाण्यासाठी निघाले आहेत अशात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ गाव पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे पारनेर तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये गावकरी कुणी प्रवाशी गावात येऊ नये म्हणून बाभळीचे फास रस्त्यावर टाकत आहेत.यात पारनेर तालुक्यातील बाबर मळा येथील ग्रामस्थांनी प्रथम पुढाकार घेऊन थेट रस्तेच बंद करण्याचे ठरवलेत.हे पाहून इतर गावांनीही पुढाकार घेऊन रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.तर काही कच्चे रस्ते जेसीबी च्या साहाय्याने खणून ठेवले जात आहेत.

यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गावातील जनतेला भावनिक आवाहन केले आहे. ‘राज्यात मुंबई, पुण्याहून मुळगावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मात्र अशा लोकांना गावी प्रवेश दिला जात नाहीये. त्यांच्याकडे संशयाने न पाहता आपल्या परिजनांना गावी येऊ द्या त्यांना अडवू नका. बाधीत रुग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी आपुलकीने वागतानाच माणुसकी सोडून नका.’ आता अशात २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन असल्याने गावाकडे जाणाऱ्या लोकांचा वेग मंदावणार आहे. मात्र, आरोग्यमंत्र्यांचे हे आहावन नागरिक स्वीकारतील अशी अपेक्षा आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात