बोंडअळीग्रस्त शेतक-यांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत देणार – कृषीमंत्री

नागपूर : बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतक-यांना बियाणे कंपन्यांकडून, विम्याद्वारे तसेच एनडीआरएफमार्फत मदत उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच, मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आत शेतकèयांना राज्य शासनामार्फत देण्यात येणारी मदत जाहीर करण्यात येईल, असे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज, शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

 अजित पवार यांनी पीक वीमा योजनेत बोंड अळीचा समावेश नाही. त्यामुळे या शेतक-यांना मदत मिळणार नाही. तसेच, जर औषध कंपन्यांनी या शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यास नकार दिला किंवा त्यांनी कोर्टात दाव घेतल्यास शेतक-यांना मदतीपासून वंचित रहावे लागेल. केंद्र शासनाकडून निधी कधी येईल याची निश्चिती नाही. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या तिजोरीतून या नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत करावी अशी मागणी केली.

त्यावर, राज्यातील 5 लाख 2 हजार 212 इतक्या शेतक-यांनी बोंडअळीमुळे कापसाचे नुकसान झाल्याचे कृषी विभागास कळविले आहे. याशिवाय महसूल विभागामार्फत बोंडअळीग्रस्त कापूस क्षेत्राचे पंचनामे सुरु आहेत. हे पंचनामे पूर्ण झाले की बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतक-यांना बियाणे कंपन्यांकडून, विम्याद्वारे तसेच एनडीआरएफमार्फत मदत उपलब्ध करुन देण्यात येईल.

राज्यात 42.6 लाख हेक्टरवर यंदा कापूस लागवड झाली असून त्यापैकी 98 टक्के क्षेत्र हे बीजी – 2 या बीटी कापूस पिकाखालील आहे. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाईची मदत दिल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही असे सांगत अधिवेशन संपण्यापुर्वी ही मदत जाहिर केली जाईल असे फुडकरांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...