दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून मदतीचा हात

लातूर : जिल्ह्यातील शिरुरअनंतपाळ येथील वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगर पंचायत सदस्य डाँ.अरविंद भातांब्रे यांच्याकडून निलंगा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना स्वखर्चातून मोफत पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने डाँ.भातांब्रे ही व्यक्ती निलंगा विधानसभा मतदारसंघात सध्या एक मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे !

लातूर येथे वैद्यकीय सेवेची प्रँक्टीस करणारे डाँ.भातांब्रे यांच्या अंगी मूळातच सामाजिक कार्याची आवड व सामाजिक बांधीलकीचं भान आहे.त्याचबरोबर राजकारणाची देखील मोठी आवड आहे.या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील दुष्काळी गावांतील लोकांच्या मदतीला ते धावून जात आहेत. हलगरा,शिरोळ,निटूर,डांगेवाडी,माचरटवाडी,हाडगा या गावांना ते दररोज टँकरने मोफत पाणी पुरवठा करुन ग्रामस्थांची तहान भागविण्यात स्वताला ते धन्य समजत आहेत.

डाँ.भातांब्रे यांच्या या दातृत्वाची व मोफत पाणी पुरवठा या स्तुत्य उपक्रमाची उभ्या मतदारसंघात मोठी चर्चा होत असून ग्रामीण भागातील लोकांकडून डाँ.भातांब्रे यांचे कोड कौतुक होत आहे. मतदारसंघातून ज्या गावातून पाणी पुरवठ्याची मागणी येईल त्या गावांना आपण मोफत पाणी पुरवठा करणार असल्याचे सांगून आपली ही मदत पाणी टंचाईची समस्या संपेपर्यंत चालूच राहणार असल्याचे डाँ.भातांब्रे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले.