पडद्यामागे वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या लोकांना ‘रंगमंच कामगार संघाचा’ मदतीचा हात

drama-clipart-drama-mask-clipart-1

मुंबई : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले.नागरिकही लॉकडाऊन मोठा प्रतिसाद देत आहेत. यासर्वांमध्ये सिनेसृष्टीत पडद्यामागे काम करणारेही अनेक कलाकार असे आहे. ज्यांचं तळहातावर पोट आहे. पडद्यामागे काम करणारे असे अनेक लोक आहे. त्यांना या लॉकडाऊनचा फटका बसला आहे. कोरोनामुळे रंगमंचावर पडद्यामागे काम करणाऱ्या अनेकांना मदत करण्यासाठी रंगमंच कामगार संघ पुढे सरसावला आहे.

तसेच सिनेसृष्टीतील इतर कलाकारांनाही मदतीचे आवाहन केले आहे. “कोरोनाचं संकटातून प्रत्येकजण बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे. मात्र, आपली मराठी कलाकार म्हणून वाटचाल सुरु असताना ह्या प्रवासात ज्यांनी पाणी आणून दिलं, जेवण वाढलं, चेहऱ्याला लागलेला रंग जपायला मदत केली, कपडे इस्त्री केले, सेटवर खिळे ठोकले, नाटकाची प्रॉपर्टी सांभाळली. थोडक्यात ज्यांचं त्यादिवशीच्या पैशांवर/पाकिटावर पोट भरत होतं. अशांना आपण मदतीचा हात द्यायचं ठरवलं आहे.आता या लोकांना शिधा आणि औषध पुरवण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. त्यासाठी इतर कलाकारांनीही मदत करावी, असे आवाहन रंगमंच कामगार संघाने केले आहे.

बॅकस्टेज आर्टिस्ट, प्रॉपर्टी बॉइज, मेक अप सहाय्यक, ड्रेसबॉय, स्पॉट बॉइज, सेटिंग बॉइज, तंत्रज्ञ इत्यादी, अशांना आपण काही दिवस पुरेल इतके अन्नधान्य,औषध आणि इतर खर्चासाठी रोख रुपये १००० अशी मदत करण्याचे ठरवले आहे. आपण शक्य होईल तितका आपला सहभाग द्या. असं आवाहन रंगमंच कामगार संघाकडून करण्यात आलं आहे.

हेही पहा –