#lockdown : लॉकडाऊन काळात धावपटू प्राजक्ता गोडबोलेच्या मदतीला धावून आली शिवसेना

shiv sena flag

मुंबई : सध्या कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये रोजगार मिळत नसल्याने हातावर पोट असणाऱ्या गरिबांचे प्रचंड हाल होत आहे. अशाच परीस्थीतीचा सामना करत होती नागपूरची उदयोनमुख धावपटू प्राजक्ता गोडबोले.

मात्र या संकटकाळी प्राजक्ताच्या मदतीला शिवसेना धावून गेली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्राजक्तच्या परिवारावर ओढवलेल्या परिस्थितीची माहिती समजली. आणि लगेचच मुख्यमंत्री ठाकरे यांनी नागपूरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांना संपर्क साधत प्राजक्ताच्या परिवाराला मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच प्राजक्ताची आई नागपूरच्या सिरसापेठ भागात राहणाऱ्या लग्नाचं कंत्राट घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडे जेवणं करायचं काम करते, मात्र या लॉकडाऊनच्या काळात रोजगार तुटल्यामुळे गोडबोले परिवाराकडे दोन वेळच्या जेवणासाठीचेही पैसे नव्हते.

दरम्यान, ‘काही दिवसांपूर्वीच आम्ही गोडबोले परिवाराशी संपर्क साधल त्यांना काही दिवस पुरेल असं अन्नधान्य आणि १६ हजार रुपयांची मदत आम्ही केली आहे. यापुढेही मदत लागल्यास आम्ही त्यांच्या संपर्कात राहणार आहोत,’ असं शिवसेनेचे नागपूर शहर प्रमुख प्रकाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.