‘…या मुलांना शोधण्यासाठी मला मदत करा’ ; सनीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय

sani leoni

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी तिच्या खासगी तसेच व्यावसायिक आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. पण, सध्या सनी तिच्या एका पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आलीये. इंस्टाग्रामवर शेअर केलेली सनी लिओनीची पोस्ट बरीच चर्चेत आली आहे.

बॉलिवूडमधील तिचा बोल्ड अंदाज व चित्रपटनमधलं तिचं काम पाहता इथेही तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते धडपडत करत असतात. अशातच अचानक सनी येवून तुमच्या समोर उभी राहिली तर काय कराल? असंच काहीसं केरळमधील मुलांसोबत झाले आहे. त्यांनी जे केलं ते पाहून सनीने चक्क चाहत्यांकडे त्यामुलांना शोधण्याचे आवाहन केले आहे.

सध्या सनी, पती आणि मुलांसोबत केरळमध्ये गेली आहे. तिथे ती निसर्गसौंदर्याचा आनंद घेत आहे. ती एका बोटीने समुद्र सफारीसाठी गेली. या सफरीदरम्यान तिला एक आगळा वेगळा अनुभव आला. समुद्रात असताना सनीच्या बोटीशेजारी एक छोटी होडी आली आणि त्या होडीमधील मुलांनी सनीला अचानक पाहताच त्यांना फार आनंद झाला. ते सगळे सनीचे नाव घेत तिचे फोटो काढू लागले. तसेच तिला चिअर करण्यासाठी ओरडू लागले.

यानंतर सनीने त्यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर करत चाहत्यांकडे मदत मागितली आहे. तिने हा फोटो शेअर करत, ‘हा फोटो व्हायरल करा आणि या प्रेमळ चाहत्यांना शोधण्यासाठी माझी मदत करा. जेणेकरुन मी त्यांना भेटू शकेन.'[ अशी पोस्ट सनीने ट्विटरवर शेअर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP