फक्त पुण्यातच अस होऊ शकत;हेल्मेट सक्तीचा दशक्रिया विधी करून निषेध

पुणे : पुणे शहरात हेल्मेट सक्तीच्या विरोधात आठवडाभरापासून राजकीय पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेनेकडून 3 जानेवारी रोजी अत्यंयात्रा देखील काढण्यात आली होती. निषेधाच्या वेगवेगळ्या शक्कली लढविणाऱ्या आंदोलकांनी निषेधासाठी जि शक्कल लढविली आहे ते पाहून तुम्ही देखील अचंबित व्हाल

काही दिवसांपूर्वी शिवसेनेनं हेल्मेटची अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला होता. आता विविध संघटनांच्या हेल्मेट विरोधी कृती समितीमार्फत हा नवा निषेधाचा प्रकार शोधून काढण्यात आला आहे.पुणे शहरातील विविध संघटना आज एकत्रित आल्या होत्या .या संघटनांनी आणि हेल्मेट विरोधी कृती समितीच्या वतीने हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी पार पडला.

विशेष म्हणजे या संघटनांनी हेल्मेटसोबत दारुच्या बाटलीत चहा, वडापाव, भेळ अशा वस्तू ठेवून हा विधी पार पाडला आहे. हेल्मेटसक्ती बंद केली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.

दशक्रिया विधीमध्ये हेल्मेट विरोधी कृती समितीचे संयोजक माजी महापौर अंकुश काकडे, शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, भाजप नेते संदीप खर्डेकर,नगरसेवक विशाल धनवडे , माजी नगरसेवक धनंजय जाधव, काँग्रेस सरचिटणीस तसेच शहरातील विविध संघटनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.Loading…
Loading...