पुण्यातील भाजप आमदारांचा फुसका बार, हेल्मेट करावाई सुरूच राहणार

टीम महाराष्ट्र देशा : पुणे शहरात राबवण्यात येणारी हेल्मेटसक्ती शिथील केल्याचा दावा शहरातील भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केला होता, मात्र काही तासांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले असून कारवाईला स्थगिती देण्यात आली नसल्याचे सांगितले आहे.

Loading...

नागपूर आणि मुंबई मध्ये हेल्मेटवर कारवाई केली जात आहे त्याचप्रमाणे पुण्यातही तंत्रज्ञानाचा वापर करून सी सी टी व्ही च्या साह्यानं कारवाई करावी, पोलिसांनी नागरिकांना वेठीस धरू नये. हेल्मेट परिधान न करणाऱ्या नागरिकांना चलन ऑफिस किंवा घरी पाठवावे, असे आदेश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

दरम्यान पोलिसांनकडून पुणे शहरात राबवल्या जाणाऱ्या हेल्मेटसक्ती कारवाईला मुख्यमंत्र्यांनी ब्रेक लावला आहे. भागात सुरु असणारी हेल्मेटसक्ती स्थगित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत, असे वृत्त आले होते. मात्र हे वृत्त खोटे असल्याचं समोर आलं आहे.

 Loading…


Loading…

Loading...