नितीश कुमार करणार बिहारच्या पूरपरिस्थितीची हवाई पाहणी

पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज सोमवारी बिहारमधील पूरपरिस्थितीची हवाई पाहणी करणार आहेत. नितीश कुमार वरिष्ठ अधिका-यांबरोबर बिहारमधील पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी करणार आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य सचिव अमृत प्रत्यय यांनी दिली. ३३ तुकड्या पूरग्रस्त क्षेत्रांत तैनात करण्यात आल्या आहेत. यात ३०० जवानांसह लष्कराच्या चार तुकड्या आणि सुमारे ७०० जवानांसह राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १६ तुकड्यांचा समावेश आहे. मदत कार्यासाठी लष्कराच्या आणखी तुकड्या पाठवण्यात येणार आहे. पुरात अडकलेल्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहितीही प्रत्यय यांनी दिली. दरम्यान, काल बिहारमधील पूरग्रस्त नागरिकांना साहाय्य करण्यासाठी मदत करण्याची विनंती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्र सरकारकडे केली होती.

You might also like
Comments
Loading...