fbpx

‘हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी ऐकून विरोधकांना गुदगुल्या’

टीम महाराष्ट्र देशा – मागच्या तीन चार तासापासून चर्चा सुरू आहे की धनंजय मुंडे यांचं हेलिकॉप्टर भरकटले आहे. ही बातमी ऐकून विरोधकांना गुदगुल्या होत होत्या. पण लक्षात ठेवा आम्ही ऐवढे निब्बर आहोत. भाजपा – शिवसेना सरकारला घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर केली. राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात आज कोल्हापूर येथून झाली. यावेळी ते बोलत होते.

कोल्हापुरात परिवर्तन सभा आयोजित करण्यात आली होती. वाऱ्याचा वेग उलट दिशेने असल्याने धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर भरकटलं. त्यामुळे कोल्हापूरऐवजी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर बीडमध्ये उतरवण्यात आलं. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे कोल्हापुरातील नेते हसन मुश्रीफ यांनी सभास्थळी दिली. यानंतर हे वृत्त प्रसारित करण्यात येवू लागलं होत.

दरम्यान, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे दोघेही नेते सुखरुप आहेत.हेलिकॉप्टर भरकटलं नव्हतं, त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं मुंडे यांनी म्हटलं होते.