वारिस पठाण म्हणजे कासिम रझवी या रझाकाराची ‘नाजायज औलाद’ : मनसे

टीम महाराष्ट्र देशा : भायखळ्याचे माजी आमदार आणि एमआयएम चे नेते वारिस पठाण म्हणजे कासिम रझवी जो रझाकार होता त्यांची नाजायज औलाद आहे. तसंच एमआयएम ही देखील रझाकारांची नाजायज औलाद आहे, अशी टीका मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.

एमआयएम नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर आता टीकेची झोड उठली आहे. अशातच मनसेत नुकतेच घरवापसी केलेले प्रकाश महाजन यांनी एमआयएम तसंच वारिस पठाण यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

Loading...

अरे नुसते १५ कोटीच काय अख्खा पाकिस्तान आणा आम्ही थुंकलो तरी तुम्ही उडून जाताल, अशा शब्दात प्रकाश महाजन यांनी वारिस पठाण यांच्यावर शाब्दिक तोफ डागली.दरम्यान, राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला असून आता या गरळ ओकणाऱ्यांच्या विरोधात आम्ही नेटाने लढू, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकातल्या गुलबर्गा इथे वारिस पठाण यांनी जाहीर भाषणात फुत्कार सोडले होते. CAA च्या विरोधातल्या मोर्चांचा संदर्भ देत ते या भाषणात म्हणाले होते,की आम्ही मुद्दाम स्त्रियांना पुढे केलं. पण विचार करा अजून फक्त आमच्या सिंहिणी पुढे आल्यात तर यांचा घाम निघालाय. आम्ही सगळे एकत्र बाहेर पडलो तर काय होईल!, अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्ष धमकी दिली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं