हेगडेंचे आरोप बोगस, तर मुंडेंवर एफआयआर दाखल करण्यापासून विचलित केलं जातंय – रेणू शर्मा

renu sharma

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.

या सर्व घडामोडींमुळे राज्यात खळबळ उडाली असतानाच या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट निर्माण होत आहे. भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी याच महिलेविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या महिलेने आपल्याला देखील ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळेच आता हे प्रकरण वेगळं वळण घेताना दिसत आहे.

२०१० ते २०१५ याकाळात रेणू शर्मा या महिलेने कृष्णा हेगडे यांना संबंध ठेवण्यासाठी वारंवार विचारणा केली. ही महिला ब्लॅकमेल करते अशी माहिती समजताच त्यांनी तिच्या हनीट्रॅपपासून वाचण्यासाठी जो प्रयत्न या महिलेने केला तो धुडकावून लावला असा दावा त्यांनी केला आहे. मैत्री व संबंध ठेवण्यासाठी दबाव या महिलेकडून पडण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ते बळी पडले नाहीत. त्यांनी यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची देखील भेट घेतली आहे.

यामुळे रेणू शर्मा यांच्या आरोपांवर संशय निर्माण होत आहेत. रेणू शर्मा यांनी ट्विट करून हेगडेंचे आरोप धुडकावून लावले आहेत. ‘कृष्णा हेगडे यांनी केलेले आरोप खोटे बोगस आणि निराधार आहेत. ते माझी प्रतिमा डागाळण्याचा आणि समाजात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुंडे यांच्यावर एफआयआर दाखल करण्यापासून माझे लक्ष विचलित करण्याचादेखील प्रयत्न केले जात आहेत. मी मुंडेंवर एफआयआर दाखल करणार असल्यावरून माझ्यावर पलटवार केले जात आहेत.’

महत्वाच्या बातम्या