दणका खासदार हिना गावितांचा ! रेशन वाटपात दिरंगाई केल्या प्रकरणी दोन दुकानदारांचे थेट लायसन्स रद्द करण्याचे दिले आदेश

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात काय आणि देशभरात काय सगळीकडे एकच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे ‘ करोना ‘ या आजाराची. राज्यातल्या ३६ जिल्ह्यांपैकी फक्त दहाच जिल्हे आहेत.ज्यात अजून एकही करोना रुग्ण सापडलेला नाही. त्या दहा जिल्ह्यापैकी अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल नंदुरबार हा जिल्हा. सध्या ‘ करोना ‘ या आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत लोकांना धीर देण्याचे काम स्थानिक प्रशासन तर उत्तम रीतीने करतेच आहे. पण स्थानिक लोकप्रतनिधींनीही आपल्या कामात कुठलीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. याचाच प्रत्यय काल नंदुरबार जिल्ह्यात आला.

नंदुरबारच्या विद्यमान खासदार डॉ.हिना गावित या स्वतः व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी २०१२ साली H1N1 या आजाराच्या काळात मुंबईला एम.एस.करत असताना त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांना त्या कामाचा अनुभव आत्ता उपयोगी पडतोय. डॉ.गावित स्वतः आपल्या मतदार संघात लोकांना धीर देण्यासोबत प्रशासनाला आजाराच्या नियंत्रण करण्यासंबंधी मार्गदर्शन करत आहेत. डॉ.गावित या नवापूर येथे गेल्या असता.या तालुक्यातील स्थानिक लोकांना त्यांनी मार्गदर्शन केले. आणि लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी नवापूर तालुक्यातील दोन गावात रेशन दुकानदार हे अन्नधान्य वाटपात हलगर्जीपणा करत असल्याची तक्रार त्यांच्या कानावर आली. डॉ. गवितांनीही तत्काळ तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले.या चौकशीत सत्य काय आहे ते समोर आले. परिणामी दोन रेशन दुकानदार हे खरोखरच धान्य वाटपात कसर करत होते त्यांचे लायसन्स हे लगेचच रद्द करण्यात आले असल्याची माहिती खासदार डॉ.हिना गावित यांनी महाराष्ट्र देशाला दिली.

त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले की ‘ माझा जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून या भागात आरोग्य सेवेच्या बऱ्याच अडचणी आहेत. यासाठी मी कुठल्याही निधीची कमतरता कमी पडू देणार नाही.

दरम्यान, डॉ.गावित यांनी नुकतेच PM CARE योजनेत एक कोटी,एक लाख रुपये दिले आहेत. तसेच अजून पैसे लागले, तर ते पैसे सुद्धा उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या कडे बोलून दाखवला आहे. नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, खासदार डॉ.हिना गावित आणि नंदुरबार शहराचे आमदार डॉ.विजय गावित हे तीनही लोकं व्यवसायाचे डॉक्टर आहेत. त्यामुळे या आजाराविषयी कुठलाही निर्णय घेतांना आमच्या शिक्षणाचा आम्हाला बराच फायदा होत असल्याची भावना सुध्दा डॉ.हिना गावित यांनी बोलून दाखवली.