पुणेकर झाले घामाघूम; तापमानात कमालीची वाढ

पुणे:- मागील अठवडयापासुन पुण्यासह संपूर्ण राज्यभरात तापमानात कमालीची वाढ झालेली पहायला मिळत आहे. या वाढत्या उष्ण्तेमुळे पुणेकर चांगलेच घामाघुम झाले आहेत. नागरिकांना सध्या सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हीटचा फील येत असून प्रचंड उकाड्यामुळे पुणेकर सध्या चांगलेच हैरान झाले आहेत. उन्हाळ्यात येणार फील पाउसाळयात देखील येत आहे. थंड पेयाच्या दुकानांसमोर नागरिक गर्दी करत आहेत. शहरात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. यामुळे हवेतील उष्माही वाढला आहे. काल शहरात तब्बल 33 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेल्याने पुणेकरांना दिवसभर उन्हाचा चांगलाच चटका सहन करावा लागला त्याचबरोबर 23.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची देखील नोंद झाली.

पुढील दोन दिवसात राज्यात मुसळधार पाउसाची शक्यता
येत्या शनिवारपर्यंत बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर येत्या 24 तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असेही हवामान विभागाने नमूद केले आहे. राज्यात मंगळवारी देखील दुपारनंतर ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रात हलका तर विदर्भात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. सोमवारी रात्रीपासूनच विदर्भातील पावसाचा जोर वाढला असून तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही नोंद झाली