fbpx

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस

मुंबई : मुंबई महानगर आणि परिसराला सोमवारी सकाळपासून जोरदार पावसाने झोडपून काढले आहे . हवामान खात्याने सोमवारी अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाळा सुरुवात झाली.

उपनगरांत पावसाचा जोर अधिक होता .गेल्या काही दिवसांपासून मुंबई परिसरात दररोज कोठे ना कोठे जोरदार पाऊस पडतो आहे . दुपारी अचानक अंधारून येऊन मुसळधार पाऊस पडण्याचा अनुभव गेले काही दिवस मुंबईकर घेत आहेत. उपनगरांच्या तुलनेत दक्शीन मुंबईत पावसाचा जोर कमी होता.