बारामतीच्या साखरेच्या ओढीने वरुणराजा बरसला

sharad pawar on rain

हवामान खात्याच्या अंदाजा प्रमाणे येत्या चार दिवसात चांगला पाऊस पडल्यास त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन, असा खोचक चिमटा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काढला होता. अस म्हणतात कि पवार साहेब बोलल्यानंतर न होणार कामही होवून जात. कालच शरद पवारांचे हे वक्तव्य येवून २४ तासही उलटले नाहीत तोच रविवारी पहाटेपासून राज्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

पावसाळा सुरु झाल्यांनतर वरुणराजाने राज्यात जोरदार हजेरी लावली. मात्र त्यानंतर गेल्या एक महिन्यापासून पावसाने दांडी मारली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. याच विषयावर बोलताना काल चिंता व्यक्त करत ‘मान्सून लांबल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आल आहे . दुबार पेरणी म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकटच आहे. पण या क्षेत्रातील काही तज्ज्ञ लोकांनी काल सांगितले की, येत्या चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात चांगला पडेल. त्यांचा हा अंदाज खरा ठरल्यास त्यांच्या तोडात बारामतीची साखर घालीन.” असे शरद पवार म्हणाले होते.

आता शरद पवार यांचे विधान आणि पाऊस पडणे हा योगायोग आहे. मात्र, नेहमी प्रमाणे आताही पवार साहेबांचे समर्थक आणि विरोधक पाऊस पडणे आणि कालचे वक्तव्य याचा सारासार संबंध कसा आहे याचे मेसेज सोशल मिडीयावर पोस्ट करत आहेत.

काही मेसेज पुढील प्रमाणे
‘’साहेब बोले महाराष्ट्र आणि देश हाले पण काल तोंडात साखर टाकील म्हंटले कि ढग पण हालते हीच ताकद आम्हा बारामतीकरांची’’

‘पवार साहेब साखर तयार ठेवा वरुणराजा बरसला’’

‘पवार साहेब साखर तयार ठेवा मंग आता. . . मराठवाड्यासह विदर्भात पावसाची हजेरी’’