…अखेर शरद पवार आपला ‘तो’ शब्द पाळणार

पुणे : हवामान खात्याच्या अंदाजा प्रमाणे येत्या चार दिवसात चांगला पाऊस पडल्यास त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन, असा खोचक चिमटा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काढला होता. अस म्हणतात कि पवार साहेब बोलल्यानंतर न होणार कामही होवून जात. शरद पवारांचे हे वक्तव्य येवून २४ तासही उलटत नाहीत तोच रविवारी पहाटेपासून राज्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

त्यामुळे आता शरद पवार आपला ‘तो’ शब्द खरा करणार का ? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. पण आज अखेर शरद पवार यांनी हवामान खात्याला बारामतीची साखर पाठवली आहे. पुण्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी हवामान विभागाला बारामतीची साखर भरवणार आहेत.