पुढील ४८ तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

Heavy rains in Konkan in next 48 hours Mumbai

मुंबई : मुंबई व उपनगरात सोमवारपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पुढील ४८ तासात मुंबईसह कोकणात असाच मुसळधार पाऊस कायम राहिल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबई व ठाण्यातील काही भागात १०० मिमी. ते १२० मिमी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला असून याकाळात गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही पावसाची संततधार कायम असेल असे सांगण्यात आले आहे.

konkan rain३१ ऑगस्टपर्यंत हा पाऊस कायम राहणार आहे. रायगड जिल्ह्यातही अतिवृष्टीचा अंदाज असून नदी किना-यावरील गावांमधील नागरिकांना, मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.