‘अतिवृष्टीमुळे शेतकरी डबघाईला आलेला आहे, मात्र राज्य सरकारने अद्यापही मदत जाहीर केली नाही’

‘अतिवृष्टीमुळे शेतकरी डबघाईला आलेला आहे, मात्र राज्य सरकारने अद्यापही मदत जाहीर केली नाही’

'अतिवृष्टीमुळे शेतकरी डबघाईला आलेला आहे, मात्र राज्य सरकारने अद्यापही मदत जाहीर केली नाही'

 अमरावती – लखीमपूरमधील घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद आहे. तुलनेनं ग्रामीण भागात जास्त प्रतिसाद आहे. मुंबईत काल मध्यरात्रीपासून आठ बसची तोडफोड झाली आहे. ठाण्यात बस बंद आहेत. नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समिती, तसंच दुकानंही बंद ठेवण्यात आली आहेत.

या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाले आहेत. मात्र भाजपाने या बंदलाविरोध केला असून सामान्य जनजीवन विस्कळीत होत असेल तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असं म्हटलं होतं.दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार प्रताप अडसड यांनी राज्य सरकारची खिल्ली उडवली आहे.

लखीमपूर येथील शेतकऱ्यांचा मृत्यू दुर्दैवीच आहे… पण इकडे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतोय इकडेही लक्ष द्यावे.. अतिवृष्टीमुळे शेतकरी डबघाईला आलेला आहे.. मात्र अद्यापही मदत जाहीर केली नाही.. त्यामुळे इकडे शेतकऱ्याचा कळवळा दाखवून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुर्लक्षित केल्या जात आहे.. अशी टीका आमदार प्रताप अडसड यांनी केली तर केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकऱ्यांचे फायदेशीर आहे.. असेही आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या