मुसळधार पावसाचा कहर, बुलडाण्यात गारपिटीनं नुकसान

टीम महाराष्ट्र देशा : नाशिक, सांगली आणि राज्यातील इतर भागाला परतीच्या पावसानं झोडपलं. रविवारी दीड तास झालेल्या मुसळधार पावसाने नाशिकला चांगलच झोडपून काढलं आहे. दीड तासात नाशिकमध्ये 40 मिमी पाऊस झाला. दमदार कोसळणाऱ्या पावसामुळे रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंड पूर्ण पाण्याखाली गेलेत.

तर पावसामुळे एका चारचाकीही पाण्यात वाहून गेली आहे. तर अनेक वाहनं पाण्याखाली गेल्याचं चित्र समोर आलं आहे. तर पावसामुळे गोदावरीच्या नदीपात्रात पाण्याचा प्रवाह चांगलाच वाढलाय.

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चारचाकीसह दुचाकीही पाण्याखाली गेल्यात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल होत आहेत. जालन्यातील सावरगाव भागडे या गावात दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहे.

मयतांमध्ये दोन महिला असून त्या मजुरीसाठी शेतात गेल्या असताना दुपारी त्यांच्यावर वीज कोसळली. दोन जखमींना जालना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या