अहमदनगर जिह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

ahmednagar district rain fall

शलाका मुंगी-धर्माधिकारी (अहमदनगर) : महिन्याभराच्या विश्रांतीनंतर साखर कारखान्याच्या जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी दुपारपासून पावसाने क्षणाचीही उसंत न घेता जिल्ह्याला झोडपून काढल आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये रविवारी दुपारपर्यंत सरासरी ४०.०२ मिमी पावसाची नोंद झालीये.महिनाभर वरूणराजने बळीराजाच्या तोंडचं पाणी पळवल होत.पेरण्या वाया गेल्याने दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यावर आली होती. त्यात धरणेही क्षमतेने न भरल्याने आवर्तने नव्हती अशात आता सतत बरसणा-या पावसाने बळीराजाला तृप्त केलंय.

मुसळधार पावसाने शहरी जनजीवन विस्कळीत झाल आहे .अहमदनगर शहराच्या ऐतिहासिक खड्यानीही तुडुंब भरून वाहायला सुरुवात केलीये . त्यामुळे रस्ता आणि खड्डा हे समीकरण नगरकरांना मांडणं कठीण जातंय. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पावसाने अहमदनगर महानगर पालिकेचे पितळ उघडे पडले आहे .

अहमदनगर जिल्हा सरासरी पर्जन्यमान
अकोले – 15 मि.मी
संगमनेर – 10 मि.मी
कोपरगाव – 7 मि.मी
श्रीरामपूर – 19 मि.मी
राहुरी – 29 मि.मी
नेवासा- 37 मि.मी
राहता – 7 मि.मी
अ. नगर- 43 मि.मी
शेवगाव – 53 मि.मी
पाथर्डी- 63 मि.मी
पारनेर- 82 मि.मी
कर्जत- 63.3 मि.मी
श्रीगोंदा – 45 मि.मी
जामखेड – 87 मि.मी.
अ. नगर जिल्हा सरासरी पर्जन्यमान – 40.02 मि.मी