पुण्यात जोरदार पावसामुळे बसवर कोसळलं झाड; चालकाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यात काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसात PMPML च्या सर्विस व्हॅन वर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत चालकाचा मृत्यू झाला. टिळक रस्त्यावर बंद पडलेल्या अन्य गाडीला मदत पोहोचवण्यासाठी ही सर्विस व्हॅन गेली असतांना ही दुर्घटना घडली. विजय नवधने असं या मृत चालकाचं नाव आहे. सुमारे तासभर चालकाचा मृतदेह बाहेर काढता आला नाही.

पुण्यावर १५ किलोमीटर उंचीचे जास्त घनतेचे ढग असून कमी वेळात जास्त पाऊस शक्य असल्याचं हवामान तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाऊस थांबेपर्यंत व पाणी ओसरेपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सायंकाळी सहा वाजता पावसाला धुमधडाक्यात सुरुवात झाली. वाहतूक कोंडी मात्र रात्री 11 वाजले तरी सुरळीत काही झालीच नाही. शहरातील पेठांमध्ये तर दूरदूर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. जंगली महाराज रोड, डेक्कन, फर्ग्युसन रोड, सिंहगड रोड, कोथरूड, कर्वेनगर, वारजे – माळवाडी, कात्रज, स्वारगेट, हडपसर, शिवाजीनगर, बाणेर , बालेवाडी, नगर रोड, येरवडा भागांत जाण्यासाठी तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

महत्वाच्या बातम्या 

Loading...