राज्यात पावसाचा धुमाकूळ; अनेक ठिकाणाचे जनजीवन विस्कळीत

rain in pune

टीम महाराष्ट्र देशा- पाऊस सतत सुरू असल्यानं नाशिक जिल्ह्यात गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. गंगापूर धरणातनं २३ हजार क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरू आहे. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातही सर्वदूर रिमझिम पाऊस सुरू असला, तरी आज सकाळी साडे आठ वाजता दोन पूर्णांक दोन मिलिमिटर एवढ्याच पावसाची नोंद झाल्याचं चिकलठाणा वेधशाळेनं सांगितलं.

दरम्यान आज सकाळी सात वाजेपर्यंत जायकवाडी धरणाचा पाणीसाठा १४ पूर्णांक १७ टक्क्यांवर गेल्याचं जायकवाडी पाटबंधारे विभागानं कळवलं आहे.वारणा आणि कोयना या दोन्ही धरणांतून सोडलेलं पाणी आणि अखंड सुरू असलेल्या पावसामुळे सांगली शहरासह जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. कृष्णा, वारणा, मोरणा, येरळा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

नवी मुंबई शहराला आणि आजुबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणारं महापालिकेचं मोरबे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून, अधिकच्या पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणाचे दोन्ही दरवाजे आज सकाळी साडे आठ वाजता उघडण्यात आले. पालघर जिल्ह्यातल्या महापारेषणच्या वसई इथल्या १०० मेगा व्होल्ट ॲम्पिअर क्षमतेच्या उपकेंद्रात पाण्याची पातळी वाढल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं इथली विद्युतयंत्रणा सकाळी साडे सहा वाजेपासून बंद करण्यात आली आहे. या नैसर्गिक आपत्तीत ग्राहकांनी सहकार्य करावं, असं आवाहन महावितरणनं केलं आहे.

रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं अलिबाग इथं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्यांना पूर आल्यानं अनेक ठिकाणी पुलांवरून वाहतूक बंद झाली आहे. महाड, नागोठणे, रोहा या गावांत सावित्री, कुंडलिका, अंबा नद्यांना मोठा पूर आला आहे.दरम्यान पावसानं रोहा तालुक्यातील वरवटणे इथं एक व्यक्ती नदीत पडून वाहून गेल्याचं वृत्त आहे. तसंच, पांडवकडा दुघर्टनेतील तीन मुलींचे मृतदेह हाती लागले आहेत. आणखी एका मुलीचा शोध सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या 

उजनीची शंभरीकडे वाटचाल, भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

कॉंग्रेसची चिंता वाढली, ‘हा’ दिग्गज नेता निवडणुकीतून माघार घेण्याच्या तयारीत

‘सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना मतदारांनी जोड्याने मारले पाहिजे’