सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये  चकमक,५ जवान शहीद

टीम महाराष्ट्र देशा – जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथील बाबगुंड परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमक तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. यात आतापर्यंत पाच जवान शहीद झाले आहेत. तर एक नागरिक ठार झाला आहे. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत.

हंदवाडा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

दरम्यान, आतापर्यंत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) तीन आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत, असं वृत्त ‘एएनआय’नं दिलं आहे.