राज्यात उष्णतेची लाट; पारा 45 अंश सेल्सीअस

राज्यात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. वर्धा इथं आज राज्यातलं सर्वात जास्त ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात आज सर्वात जास्त ४३ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान परभणी इथं नोंदवलं गेलं. औरंगाबाद आणि उस्मानाबाद इथं ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.