Share

Alia-Ranbir Baby | आलिया-रणबीरच्या मुलीचे नाव ऐकून, आजी नीतू कपूर झाली भावूक

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नुकतेच आई-वडील झाले आहेत. आलियाने एका गोंडस लक्ष्मीला जन्म दिल्यानंतर त्यांचे चाहते बाळाची झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहे. त्याचबरोबर कपूर कुटुंबामध्ये हा आनंद साजरा केला जात आहे. बाळाची आजी म्हणजे नीतू कपूर (Neetu Kapoor) देखील खूप खुश आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला हा आनंद व्यक्त केला होता. तर दुसरीकडे आलिया-रणबीर (Alia-Ranbir) ने आतापर्यंत मुलीचा कुठलाही फोटो चाहत्यांना दाखवला नसला तरी त्यांनी मुलीच्या नावाबाबत खुलासा केला आहे.

आलिया-रणबीर (Alia-Ranbir) च्या बाळाचे नाव

6 नोव्हेंबर 2022 रोजी आलिया भट आणि रणबीर कपूर पालक झाले आहेत. आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ज्यामुळे कपूर आणि भट कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हापासूनच आलिया आणि रणबीरच्या चाहत्यांना त्यांच्या मुलीचा फोटो आणि नाव जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, आलिया आणि रणबीरने त्यांच्या मुलीचे नाव शॉर्टलिस्ट केले आहे अशी माहिती समोर आली आहे. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव आजोबा ऋषी कपूर यांच्या नावावरून ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या माहितीनुसार, रणबीर आणि आलियाने आपल्या मुलीचे नाव दिग्गज अभिनेते म्हणजेच बाळाचे आजोबा ऋषी कपूर यांच्या नावावरून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलीवूड लाईफच्या एका रिपोर्टनुसार, आई-वडिलांचे नाव एकत्र करून मुलाचे नाव ठेवण्याचा ट्रेंड आलिया आणि रणबीर फॉलो करू इच्छित नाही. दरम्यान, ते दोघं बाळाचे आजोबा म्हणजेच ऋषी कपूर यांच्या नावावरून बाळाचे नाव ठेवणार आहे. त्यासाठी त्यांनी एक खास नाव देखील शॉर्टलिस्ट केले आहे.

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना श्रद्धांजली म्हणून आलिया आणि रणबीर त्यांच्या मुलीचे नाव ऋषी कपूर यांच्या नावावर ठेवणार आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळालेली असून लवकरच या नावाचा खुलासा होणार आहे. सून आलिया भट आणि मुलगा रणबीर यांच्या या निर्णयावरून आजी नीतू कपूर भावुक झाली आहे. दरम्यान, कपूर कुटुंब आपल्या राजकुमारीचे नाव जगासमोर जाहीर करण्यासाठी आतुर आहे.

महत्वाच्या बातम्या 

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नुकतेच आई-वडील झाले आहेत. आलियाने एका गोंडस …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now