अर्जुन खोतकरांची आमदारकी टिकणार की जाणार ? आज फैसला !

arjun-khotkar

टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आमदारकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पी.व्ही.नलावडे यांनी अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द केली होती. त्यानंतर त्यांच्या आमदारकीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे.

दरम्यान, खोतकारांची आमदारकी तांत्रिक मुद्द्यावर न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत मी सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं अर्जुन खोतकरांसमवेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही ठणकवलं होतं.